काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा – आंबेडकर

congress(10)

टीम महाराष्ट्र देशा-गुजरात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा असा टोला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून कॉंग्रेसविषयी अनेक मत- मतांतरे समोर येत आहेत.

गुजरातमध्ये आपल्याशिवाय पर्याय नसल्याची काँग्रेसची भावना घातक असल्याचंही ते म्हणाले.

तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसकडून भाजपविरोधी पक्षांशी संवाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसचा टीकाव लागणार नाही, असे ते म्हणालेत.

दरम्यान हार्दीक पटेल आणि अल्पेश ठाकोर हे परस्परविरोधी नेते काँग्रेससोबत कसे टीकतील, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

 Loading…
Loading...