महाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला; मुख्यमंत्र्यांची चिंता वाढणार

devendra fadnvis crime

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्र सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. अनिकेत कोथळे प्रकरण असो वा  कोपर्डी हत्याकांड या सारख्या अनेक गुन्हामुळे गृहखात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात आहे. मुख्यमंत्रीपद हे दोन्ही पदे   सांभाळता येत नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करती आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला आहे.

राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) सादर केलेल्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्राचा  २०१५ मध्ये गुन्हेगारी दर हा एक लाखा मागे ३५५.१९ इतका होता तर २०१६ मध्ये एक लाखा मागे ३५७.४१ इतका होता. एकूण राष्ट्रीय गुन्हेगारी दर हा ३७९.३ इतका आहे. महाराष्ट्राचा गुन्हेगारी दर जरी वाढला असला तरी मुंबईसाठी एक दिलासादायक अहवाल समोर आला आहे. मुंबईतील गुन्हेगारी दर गेल्यावर्षीच्या तुलनेत बऱ्या पैकी कमी झाला आह. मुंबईचा २०१५ चा गुन्हेगारी दर हा एक लाख मागे ३६२ इतका होता २०१६ मध्ये तो कमी होऊन ३२०.९ येऊन पोचला आहे.

महाराष्ट्रा मध्ये विविध ४.५ लाख गुन्हांची नोंद झाली असून. एकूण लोकसंख्येच्या निकषांवरून गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर असून देशातल्या २९राज्यांतील सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये आठव्या  स्थानावर आहे.

मुंबईचा विचार करता मुंबईतील गुन्हेगारी दर बऱ्यापैकी कमी झाला आहे. २०१५ मध्ये मुंबईत ६६,६७६ गुन्हाची नोंद झाली होती २०१६ मध्ये गुन्हेगारी दर१२ % कमी झाला आहे. २०१६ मध्ये ५९.०७२ गुन्हाची नोंद झाली आहे.

२० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या १९ शहरांचे निरीक्षण करण्यात आले. या १९ शहरामध्ये मुंबई गुन्हेगारी नोंदीच्या तिसऱ्या स्थानावर असून दिल्ली व चेन्नई अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. हिंसक गुन्हे नोंदीच्या यादीमध्ये मुंबई१५ स्थानावर आहे.

महाराष्ट्रातील हिंसक गुन्हांचे प्रमाण वाढले आहे. ४२.४६८ हिंसक गुन्हे नोंदविले गेले आहे त्याची एकूण गुन्हेगारी दर ३५.२ इतका होतो जो राष्ट्रीय गुन्हेगारी दरापेक्षा अधिक आहे.राष्ट्रीय गुन्हेगारी दर हा २०१५ मध्ये ३३.७ इतका होता

राज्यामध्ये २०१६ मध्ये ९४९१९ लोक बेपत्ता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या सर्वाधिक केसेस महराष्ट्रात नोंदविले गेले आहेत.बलात्कारच्या गुन्हाच्या नोंदीमध्ये महराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.