प्रेयसीच्या वडिलांची हत्या करणा-या प्रियकराची निर्दोष मुक्तता

mother,son,attack,sangali

टीम महाराष्ट्र देशा- प्रेयसीच्या वडिलांची हत्या करणा-या प्रियकराची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सबळ पुराव्याअभावी ठाणे जिल्हा न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी त्याची निर्दोष सुटका केली आहे. कळव्यातील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या मधेश पौंडर उर्फ सुब्रमण्यम (मूळचा तामिळनाडू) यांची १६ सप्टेंबर २०१३ मध्ये मफतलाल कम्पाउंड परिसरात हत्या झाली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी कांजूरमार्ग कर्वेनगर येथील २२ वर्षीय मुन्ना मोईद्दीन शेख उर्फ गुड्डूला अटक केली होती.

शेख व मधेश यांचा मोठा मुलगा जयसिंगराज हे दोघेही एकाच कारागृहात बंदिस्त होते. भाऊ जयसिंगराजला भेटण्यासाठी कारागृहात जात असलेल्या लक्ष्मीचे शेखसोबत सुत जुळले होते. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर शेख आणि लक्ष्मीमध्ये असलेल्या संबधांची माहिती लक्ष्मीचे वडील मधेश यांना मिळाली. मधेश यांचा या दोघांच्या प्रेम संबधांना विरोध होता. यामुळे रागाच्या भरात मधेश यांची शेखने हत्या केली, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, आरोपीच्या वकीलांनी शेख याचा हत्येत सहभाग नसून त्याला अडकवण्यात आल्याचा दावा केला.