व्हाटसअॅपवर व्हिडीओ पाठवून खंडणीची मागणी करणा-या ६ जणांना अटक

टीम महाराष्ट्र देशा-    व्हाटसअॅपवर व्हिडीओ पाठवून दीड कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. अपहरणकर्त्यांनी एका व्यापाऱ्याचे अपहरण करून दीड कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी करत व्हाटसअॅपवर व्हिडीओ पाठवला होता. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ६ जणांना अटक केली. मोहम्मद शानू मोहम्मद रफीक शेख, संदीप नारायण शर्मा, चंद्रबान छत्रधारी सिंग ऊर्फ ऊधम, अनिल राजेंद्रनाथ पांडे, धीरज इंद्रभान सिंग, मोहम्मद मुन्ना सलीम कबाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अपहरणकर्त्यांनी भावेन शहा या व्यापाऱ्याचे अपहरण करून तीन दिवस डांबून ठेवले होते. भावेन शहा आणि त्यांचे वडील केमिकल विक्री आणि वाहतुकीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाकरिता अलिकडेच त्यांनी नवीन टँकर खरेदी केला होता. त्यासाठी ते अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात परवान्यासाठी गेले होते. मात्र, ते घरी परत आले नाही. त्यांचे मोबाईल बंद होते. त्यांच्या पत्नीने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यांनतर पोलिसांनी कारवाईत करत सहा जणांना अटक केली.Loading…
Loading...