जेथे काँग्रेसची सत्ता आहे, तेथील विकास हरवत जातो- गृहमंत्री राजनाथ सिंग

टीम महाराष्ट्र देशा – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देशात जेथे काँग्रेसची सत्ता आहे, तेथील विकास हरवत जातो असे वक्तव्य हिमाचल प्रदेशमधील सभेत बोलताना केले. कुनिहार जिल्हय़ातील अर्की मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार रतनपाल सिंग यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते तसेच मुख्यमंत्री वीरभद्र सिंग उभे आहेत.

bagdure

राजनाथ यांनी हिमाचलच्या काँग्रेस सरकावर शरसंधान केले. तसेच त्याची तुलना भाजपशासित राज्यांशी केली. काँग्रेसचे सरकार असणाऱया राज्यांच्या तुलनेत भाजपशासित राज्यांनी अधिक विकास गाठला. छत्तीसगढ आणि झारखंड यासारखी राज्ये याची उदाहरणे आहेत. तेथे भाजपची सत्ता आल्यानंतर स्थिती वेगाने बदलत विकास झाल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला.

You might also like
Comments
Loading...