कल फिर MNS के गुंडे विक्रोली में पिटे।- संजय निरुपम

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा – मनसे व कॉंग्रेस मुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आमने – सामने आले आहेत. कॉंग्रेसचे संजय निरुपम तर मनसेला नेहमीच टार्गेट करती असतात. काल विक्रोळीत मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले आहे.

ट्वीटमध्ये संजय निरुपम म्हणाले, “काल पुन्हा एकदा मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊन दरदिवशी मनसेच्या गुंडांनी लाथ मारली आणि तेही पोलिसांसमोर तर उत्तर दिलं जाईल. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडावी.”

काय आहे विक्रोळी येथील मारहाण प्रकरण ?

दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून रविवारी दुकान मालकांना निवेदन दिलं जातं होतं. त्याचवेळी स्थानिक दुकानदार आणि काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या 15 ते 20 साथीदारांनी मारहाण सुरु केली. यात मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि इतर 4 जण जखमी झाले.