कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर मोठा अन्याय केला

मोदीचे कॉंग्रेसवर टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा – एका कुटुंबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर मोठा अन्याय केला. जेव्हा काँग्रेसवर पंडित नेहरुंचा प्रभाव वाढला, तेव्हा काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या संविधान सभेतील समावेशास अडथळे निर्माण केले’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज हल्लाबोल केला. ते धंधुका येथील प्रचार सभेत बोलत होते. तत्पूर्वी मोदींनी ट्विट करुन डॉ. आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली.