फेसबुक का मागत आहे तुमचा फोटो ?

facebook

टीम महाराष्ट्र देशा – फेसबुक यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी फेसबुक युजर्सच्या सुरक्षेचा प्रश्न देखील वाढला आहे. त्यामुळं फेसबुक युजर्सची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी फेसबुक तुमच्या फोटोची मागणी करणार आहे.

फेसबुकने मागील काही दिवसापूर्वी फेसबुक युजर्सची फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचे फिचर अॅड केले होते. या फिचरमुळे फेक न्यूजला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.आता फेसबुक आपल्या युजर्सची जास्त काळजी घेत आहे.

वायर्ड डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार एका तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुकचा युजर हा रोबोट नसून मनुष्य असल्याची खात्री करता येणार आहे. ट्विटरवर एका युजरकडून या नोटिफिकेशन संदर्भातील एक ट्विट स्क्रीनशॉटच्या साहाय्यानं शेअर करण्यात आलंय. ‘कृपया तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसत असलेला एक फोटो अपलोड करा. पडताळणी केल्यानंतर हा फोटो लगेचच डिलीट करण्यात येईल’ असं नोटिफिकेशन तुम्हाला देखील येऊ शकतं.

फेसबुकवरील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी व अशा व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी फोटोच्या साहाय्यानं ही चाचणी केली जात असल्याचं फेसबुकच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलंय.

रिपोर्टनुसार ही एक स्वयंचलित यंत्रणा असून यात संशयास्पद हालचालींवर नजर आणि फोटोची सत्यता पडताळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. फोटोची पडताळणी होत असताना तुमचं अकाऊंट लॉग आऊट होणार असून त्या दरम्यान तुम्हाला फेसबुक वापरता येणार नाही.Loading…
Loading...