fbpx

विमान कोणाच उडणार? भाजपाच्या दिग्गज मंत्र्यांमध्ये रस्सीखेच

chandrakant vs eknath kdse

टीम महाराष्ट्र देशा –   देशात लवकरच डोमॅस्टिक विमानसेवा सुरु होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वमंत्री आपल्या मतदार संघात विमानसेवा सर्वात आधी सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत नेहमीच चर्चेत असणारे कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा असेल.

कोल्हापूरहून मुंबईसाठी विमानसेवा सुरु व्हावी यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तर जळगावहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी खडसेही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी हे दोन्ही नेते विमान प्राधिकरणाकडे आपलं राजकीय वजन वापरत आहेत.

या स्पर्धेमुळे विमान नक्की कुणाचं पहिल्यांदा उडणार, कोल्हापूरचं की जळगावचं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन्ही ठिकाणांहून मुंबईकरता विमानसेवा सुरु होणार आहे. मात्र यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापैकी नक्की बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.

1 Comment

Click here to post a comment