कॉलेजचे आयकार्ड जेव्हा एटीम बनते.

कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी पुण्यात अनोखा प्रयोग

टीम महाराष्ट्र देशा – कॉलेजचे ओळखपत्र म्हणजेच आयकार्ड हे फक्त कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी पुस्तके किवां कॉलेजच्या इतर कामाकरिता आयकार्डचा वापर होतो. पण आता मात्र कॉलेजचे हे आयकार्ड कॉलेज पुरतेच मर्यादित नराहता एटीम देखील होणार आहे.

कॅशलेस व्यवहारास चालना मिळावी याकरता पुण्यातील सी.ओ.ई.पी महाविद्यालयात एक अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. सीओईपी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या ‘कॉम्बो कार्ड’मुळे हे शक्य होणार आहे.

‘सीओईपी’च्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बँकेने दिलेल्या या कॉम्बो कार्डचे उद् घाटन सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरमधील सरव्यवस्थापक संजय बिहारीलाल आणि सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांच्या हस्ते झाले. ‘सीओईपी’चे उपसंचालक बी. एन. चौधरी, पुण्यातील उपसरव्यवस्थापक प्लाबन मोहंता, सहायक सरव्यवस्थापक चंद्रकांत पाठक, सहायक सरव्यवस्थापक अजय जोशी, शाखा व्यवस्थापक प्रतीक्षा तोंडवळकर, ‘सीओईपी’च्या विद्यार्थी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. एल. पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थी विभागाचे अधिष्ठाता उपस्थित होते.

‘हे कार्ड म्हणजे कॉलेजचे ओळखपत्र (आय कार्ड) आणि एटीएम-डेबिट कार्डाचे एकत्रीकरण आहे. देशात असे कार्ड पहिल्यांदाच तयार करण्यात आले आहे. कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड दिले जाणार आहे. या कार्डावर विद्यार्थ्याचे नाव, रक्तगट, विशिष्ट नोंदणी क्रमांकाची नोंद आहे. त्याआधारे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या सर्व सुविधा वापरता येणे शक्य आहे. वसतिगृहाबरोबरच कॉलेजमध्ये चोवीस तास सुरू असणाऱ्या काही लॅबचे दरवाजेही या कार्डाआधारे उघडू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होते,’ असे डॉ. आहुजा यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारच्या कॅशलेस धोरणानुसार विद्यार्थ्यांना कॉलेजची फी भरणे, स्कॉलरशिप स्वीकारणे अन्य व्यवहार करण्यासाठीही या कार्डाचा वापर करता येईल,’ असेही डॉ. आहुजा म्हणाले.

coep sbi card
file photo
You might also like
Comments
Loading...