जर 15 वर्षं डल्ला मारला नसता तर आज हल्लाबोल करण्याची गरज नसती

हल्लाबोल करून दाखवाच,तुमचाही मालमसाला उघड करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या वतीने  फडणवीस सरकार विरोधात राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे  या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राष्ट्रवादीस प्रतिउत्तर दिले आहे.

जर 15 वर्षं डल्ला मारला नसता तर आज हल्लाबोल यात्रा करण्याची गरज नसती असं सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसंच हल्लाबोल करून दाखवाच तुमचा मालमसाला उघड करू अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज वर्ध्यापासून हल्लाबोल यात्रा सुरू केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या सभेत राष्ट्रवादी हल्लाबोल यात्रेचा खरपूस समाचार घेत चांगलाच इशारा दिलाय.

आज ही लोकं हल्लाबोल यात्रा काढताय. पण जर 15 वर्षं डल्ला मारला नसता तर आज हल्लाबोल यात्रा काढायची गरज भासली नसती. जर हल्लाबोल केला तर यांचा इतका माल मसाला आमच्याकडे आहे तो आम्ही उघडा करू, त्यामुळे यांचा हल्ला यांच्यावरच परतवून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दिलाय.

You might also like
Comments
Loading...