नो पार्किंग मधील गाड्या दाखवा आणि मिळवा ५० रूपये

नितीन गडकरीची भन्नाट आयडीया

टीम महाराष्ट्र देशा  कुठेही कशाही पार्क केलेल्या गाड्या त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे देशातल्या बहुतांश शहरांचं चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एक आयडीया काढली आहे. अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो काढा ते पोलिसांना पाठवा आणि ५० रुपयांचं बक्षिस मिळवा अशी योजना लवकरच सुरू केली जाणार आहे.

लवकरच मी मोटर वाहन कायद्यात सुधारणा करून एक तरतूद करणार आहे, ज्या अंतर्गत जी व्यक्ती अनधिकृतपणे रस्त्यावर लाववेल्या गाड्यांचे फोटो काढून संबंधित अधिकारी किंवा पोलिसांकडे पाठवेल त्याला ५०० रूपयांच्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षिस म्हणून दिली जाईल.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की संसदेकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या व्यक्ती, लोकांच्या अँम्बेसेडर गाड्या येत असतात. या सगळ्यामुळे संसदे समोरच्या मार्गावर कोंडी होते. यामुळे आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागत असल्याचं ते म्हणाले. पार्कींगतळ उभारण्यासाठी १३ विविध परवानग्यांची गरज असते ज्या मिळायला अनेक महिने वाट बघावी लागते. ही गोष्ट आपण तत्कालीन नगरविकासमंत्री वैंकय्या नायडू यांच्या निदर्शनास आणल्याचंही त्यांनी सांगितलं. वाहतूक विभागासाठी अॅटोमॅटीक पार्कींगतळ उभारण्यासाठी ९ महिने परवानग्यांची वाट पहावी लागल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

You might also like
Comments
Loading...