fbpx

सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आज सांगलीत

Aniket Kothale Murder News

टीम महाराष्ट्र देशा –  अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद उद्या सांगली येथे येत आहेत. त्यांच्याकडून पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनिकेत कोथळे याच्या खूनप्रकरणी त्याच्या कुटुंबियांसह विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी या दोघा वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर संशय व्यक्त केला आहे.

त्या अनुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनील रामानंद कोथळे कुटुंबिय व सांगली शहर पोलिस ठाण्यासही भेट देऊन माहिती घेणार आहेत. दरम्यान, या खूनप्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने पाईप व पाण्याची बादली जप्त केली असून या गुन्ह्याकामी वापरलेली दोरी अद्याप हाती लागली नसल्याचे समजते.

1 Comment

Click here to post a comment