भुजबळ निर्दोष आहेत : खासदार सुप्रिया सुळे

किमान दिलीप कांबळेना तरी कळाले की भुजबळ निर्दोष आहे

टीम महाराष्ट्र देशा – छगन भुजबळ हे लढवय्ये व्यक्ती असून कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील’ असे वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल आहे .दिलीप कांबळे यांच्या विधानाचे स्वागत आहे, किमान आता त्यांना तरी कळाले की भुजबळ निर्दोष आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने भुजबळ निर्दोष असल्याचे यापुर्वी दावे करण्यात येत होते. कांबळे यांच्या वक्तव्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.