पुण्यात तरुणाची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक

पुणे : तुम्ही आजपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू घेण्यावरून अनेक जणांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याचे ऐकले असेल. परंतु कुत्रा ऑनलाईन मागवत असताना फसवणूक झाल्याची ही पहिलीच घटना असावी. हिंजवडी परिसरात अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. यातून होणारे फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात असाच प्रकार घडला आहे. कुत्रा विक्रीची जाहिरात एका संकेतस्थलाला देऊन अनेकांना चुना लावणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

राजन जनार्धन शर्मा असे या भामट्याचे नाव असून त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. याबाबत शुग्रा रस्तोगी (वय-35, रा.हिंजवडी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुभ्रा रस्तोगी यांनी ऑक्टोबर महिन्यात लोकॅन्टो या संकेतस्थळावरून shih tzu puppies या जातीचा कुत्रा बुक केला होता.

साईटवर दिलेल्या मोबाईलवर संपर्क करून 10 हजार रुपये राजन शर्मा याला ऑनलाईन पद्धतीने पाठवले होते. परंतु शुभ्रा यांना कुत्रा काही मिळाला नाही. नंतर राजन हा शुभ्रा यांचा फोनही उचलत नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शुभ्रा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राजन याला ताब्यात घेतले आहे.

You might also like
Comments
Loading...