दरवर्षी खड्डे पडणार आणि डिसेंबरमध्ये बुजवले जाणार

टीम महाराष्ट्र देशा – ५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असणाऱ्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन जवळ आलेली असताना चंद्रकांत पाटील एक  वक्तव्य  केले आहे.

राज्यातील रस्त्यांचे नियोजन चुकल्याने खड्डे पडले, रेतीच्या ट्रकमुळे रस्ते खड्डेमय, दरवर्षी खड्डे पडणार आणि डिसेंबरमध्ये बुजवले जाणार असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांचे आश्वासन पूर्ण न होण्याची जाणीव आहे असेच दिसते आहे. राज्यातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये खड्डे ही समस्या मोठी आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर ‘सेल्फी विथ खड्डा’ अशी मोहिमही हाती घेतली. विरोधकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकाही केली होती.