सुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरल नाही – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खड्डयांसोबत सेल्फी काढल्याच्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार पलटवार केला आहे.

सुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरलेलं नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील आणि भावाला विचारावे की राज्यातील रस्त्यांवर त्यांनी १२०० ते १५०० कोटी रुपयांच्यावर कधी तरतुदच केली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट खड्डे भरण्यातच संपतं. असं स्पष्टीकरण वजा टोलाही चंद्रकांत पाटलांनी हाणलााही टोला चंद्रकांत दादांनी हाणला आहे.