ऑटोत आधीपासूनच 3 पुरुष आहेत, तर त्यात का बसावे?: किरण खेर यांचा तरुणींना अजब सल्ला

Kiron Kher

टीम महाराष्ट्र देशा – चंडीगडमध्ये एका युवतीवर सामूहिकरीत्या बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर महिला सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना. चंडीगडच्या खासदार किरण खेर यांनी मात्र एक वादग्रस्त वक्तव्य केल आहे. रिक्षामध्ये अगोदरच तीन पुरुष बसलेले असताना त्या युवतीने त्या रिक्षात बसने योग्य होते का ? त्या युवतीने स्वताची काळजी घेणे गरजेचे होते. असे वादग्रस्त वक्तव्य किरण खेर यांनी केले होते. बलात्कारच्या अनेक घटना उत्तर भारतात घडत आहेत. घरात तर महिलांवर बलात्कार केले जात आहेत पण सामुहिक बलात्कार ही फार भयंकर घटना आहे. चंडीगडमध्ये वेगळ्या महिला आयोगाची गरज नसून सोशल वेलफेयर डिपार्टमेंट महिलांना  तक्रार नोंदविण्यासाठी पुरेसे आहे. सामुहिक बलात्कार घटनेनंतर चंदगडमध्ये मोठ्याप्रमाणात निषेध नोंदविण्यात  येत आहे. या बरोबरच पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उभा करण्यात येत आहे .असे मत खेर यांनी व्यक्त केले होते.

किरण खेर यांचा त्या वादग्रस्त वक्तव्यावरून यु टर्न

मी असे बोले होते की दुनिया फार खराब आहे. मुलीनी स्वताची काळजी घ्यायला हवी.चंडीगड पोलीस सुरक्षितेसाठी नेहमीच तत्पर असतात. १०० नंबर फोन करून कोणत्याही क्षणी मदत घेऊ शकतात. माझ्या वक्तव्यावर राजकारण करू नये. वादग्रस्त वक्तव्यानंतर गदारोळ झाल्यानंतर किरण खेर यांनी यु टर्न घेतला आहे.

काय होते प्रकरण?
20 नोव्हेंबरला मोहालीमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप झाला होता.
वास्तविक, तिने घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा थांबवला. वाटेत ड्रायव्हरने सेक्टर 42च्या पेट्रोल पंपावर इंधन भरले.
ऑटोत दोन जण आधीपासूनच बसलेले होते. तरुणीला वाटले की, ते प्रवासी आहेत. यादरम्यान, ऑटो ड्रायव्हरने सेक्टर 53च्या स्लीप रोडवर ऑटो खराब झाल्याचा बहाणा करून तो थांबवला. तरुणीने जेव्हा किराया किती झाला अशी विचारणा केली, तेव्हा ऑटो ड्रायव्हरच्या साथीदारांनी तिचे तोंड दाबले आणि झुडपात नेऊन गँगरेप केला होता.

तथापि, पोलिसांनी आरोपी मोहम्मद इरफान, मोहम्मद गरीब आणि पोपू सीरियल यांना अटक केली आहे. 29 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्यांची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आता याप्रकरणी शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.