अंड्यांनंतर चिकनच्या दरातही वाढ होण्याची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात अंड्याचे दर वाढल्यानंतर आता चिकनचेही दर वाढण्याची शक्यता आहे. वेंकीज इंडिया लिमिटेडचे संचालक व्यंकटेश राव यांनी चिकनचे दर वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या दरांमध्ये किती रुपयांनी वाढ होणार आहे हे अद्याप निश्चित झाले नाही. ‘हिवाळ्यामध्ये चिकनला जास्त मागणी असते. त्यातच मका आणि सोया या कोंबड्यांच्या खाद्याची ७५ टक्के उपलब्धता असल्याने कुक्कुट पालन करणारे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक एकत्र येऊन चिकनचे दर पुन्हा वाढवतील, असे वाटत, असेही राव यांनी सांगितले.