23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? मग काय 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? – हार्दिक पटेल

हार्दिक पटेलचे भाजपला प्रतिउत्तर

टीम महाराष्ट्र देशा – पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. हार्दिक पटेल याचे अजून चार कथित सेक्स व्हिडीओ लीक करण्यात आले आहेत. दरम्यान हार्दिक पटेलने 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? मग काय 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? असा प्रश्न विचारला आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेलने व्हिडीओमधील व्यक्ती आपण नसून, ही बनावट सीडी असल्याचा दावा केला आहे.

कथित सेक्स सीडी समोर आल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल भरुच येथील सरभन गावात सभेसाठी पोहोचला होता.काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? अटलबिहारी वाजपेयी एकदा बोलले होते की, मी विवाहित नाहीये, पण संन्याशीही नाही. एका भाजपा आमदाराने चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला, पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेस नाही, तर भाजपा विरुद्ध हार्दिक आहे’, असं हार्दिक पटेलने सांगितलं आहे.

You might also like
Comments
Loading...