पद्मावतीच्या समर्थनात बॉलिवूड मैदानात ; १६ नोहेंबरला काढणार मूकमोर्चा

टीम महाराष्ट्र देशा –   ‘पद्मावती’ या सिनेमाला देशभरातून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील विविध संघटना या सिनेमाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्यात. काहीही झालं तरिही ही दादागिरी सहन करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीय. भन्साळी हे अत्यंत जबाबदार दिग्दर्शक असून ते आपल्या सिनेमातून काहीही चुकीचं दाखवणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

bagdure

बॉलिवूडमधले दिग्दर्शक अशोक पंडित, सुधीर मिश्रा, राहुल रवैल आणि सिंटाचे सुशांत सिंग असे सगळे या पत्रकार परिषदेला हजर होते. यावेळी विविध संघटनांकडून होत असलेल्या मुस्कटदाबीचा निषेध करण्यातासाठी येत्या 16 नोव्हेंबरला गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीबाहेर सकाळी 11 वाजता मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय.

त्यासोबतच संध्याकाळी चार ते सव्वाचार अशी पंधरा मिनिटं मुंबईतील सर्व शुटिंग्ज बंद ठेवून कलाकारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेधही करण्यात येईल. याशिवाय ‘पद्मावती’च्या विषयात लक्ष घालण्यासाठी लवकरच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

You might also like
Comments
Loading...