ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या- सर्वोच्च न्यायालय

blue vel

आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. चेन्नईच्या एका वकिलाने ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ब्लू व्हेल गेममुळे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात जवळपास 100 आत्महत्या झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण नोंदवलं.

Loading...

यासोबतच ब्लू व्हेल गेमचे धोके लक्षात यावेत यासाठी दूरदर्शन आणि खासगी चॅनेल्सवर जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिला आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना सांगितलं आहे की, तज्ञांची समिती गठीत केली असून, पुढील तीन आठवड्यात रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे.

 

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...