पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना 80 मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना 33 मते पडली आहेत.

दरम्यान,महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले होते तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. वेगळा वेश परिधान करुन महापौरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आजच्या या निवडीवेळी सत्ताधारी भाजपचे 3 नगरसेवक तर, राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर, अपक्ष पाच नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. दरम्यान, शिवसेना तटस्थ राहिली.

पुण्यात सत्ताधारी भाजपला दणका; पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने राखला गड

You might also like
Comments
Loading...