”राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची ‘औलाद’ वाटतात”

टीम महाराष्ट्र देशा -राहुल गांधी सध्या गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारकरीता गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. गुजरात मधील अनेक मंदिरांना भेटी देत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे.

Loading...

आपल्या विधानांमुळे नेहमी वादात राहणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

‘राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात , राहुल सध्या मंदिरांमध्ये फिरत आहेत, तर त्यांच्या पक्षाचे कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा विरोध करत आहेत. जर 2019 पर्यंत राम मदिर बनलं नाही तर देशातील लोकांवर अन्याय होईल’ असं ते म्हणाले. भाजपा नेता जीवीएल नरसिम्हा राव यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना अल्लाउद्दीन खिलजीचा नातेवाईक असल्याचं ट्विट केलं होतं. त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत साक्षी महाराज यांनी राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात असं वक्तव्य केलं आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...