हार्दिक पटेलमध्ये नेहरूंचाच डीएनए भाजप नेत्यांची मुक्तफळे

भाजपा नेत्यांची टीका करताना जीभ घसरली

टीम महाराष्ट्र देशा – भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी नेहरूंना रंगीन मिझाज म्हणत हार्दिक पटेलमध्ये त्यांचाच डीएनए असल्याचं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच झोडपलं. तसंच, त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोत काही फोटो हे नेहरूंच्या आप्तेष्ट स्त्रियांचे असल्यामुळे नेटकऱ्यांनी मालवीय यांच्या अज्ञानाचाही चांगलाच समाचार घेतला.

मालवीय यांनी बुधवारी हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याविषयी एक ट्वीट केलं. या ट्वीटसोबत त्यांनी नेहरूंच्या फोटोंचं कोलाज पोस्ट केलं. त्यात पंडीत नेहरू काही स्त्रियांसोबत दिसत आहेत, त्यावर हे ट्वीट केलं गेलं होतं. पण, नेहरूंची प्रतिमा मलीन करण्याच्या नादात मालवीय यांच्याकडून एक भलतीच चूक झाली. या कोलाजमधील फोटोंमधील पहिला आणि तिसरा असे दोन फोटो हे नेहरूंची सख्खी बहीण विजयालक्ष्मी पंडीत यांचे आहेत. तर पाचव्या फोटोमध्ये नेहरूंसोबत असलेली स्त्री या सुप्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई आहेत. मृणालिनी या नेहरूंच्या आप्तेष्ट होत्या. या कोलाजमधील नववा फोटो हा नेहरू यांची भाची नयनतारा सेहगल यांचा आहे.