भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा विसर- धनंजय मुंडे

मुंबई: ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्यांच्याच कार्याचा सरकारला विसर पडला आहे. अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडला आहे. मराठवाडा विद्यापीठात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक अध्यासन विभाग सुरू केला. उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विभागाला १५० कोटी अनुदानाची घोषणा केली, मात्र त्या अध्यासनाला एकही रूपयाचे सहकार्य अद्याप करण्यात आलेले नाही. असे मुंडे म्हणाले.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकाला निधी दिला तर नाहीच पण या अर्थसंकल्पात व राज्यपालांच्या अभिभाषणातही स्मारकाचा उल्लेख नव्हता. असे धनंजय मुंडे यांनी सभागृहात स्पष्ट केले.