भाजप सरकार म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल – आ. प्रणिती शिंदे

टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर केंद्र आणि राज्यातील सरकारे निव्वळ बोलबच्चन. खोटे बोल पण, रेटून बोल. फसव्या जाहिराती अन् फसव्या योजना. नोटाबंदीने नोकऱ्या गेल्या, जीएसटीने व्यापार ठप्प झाला. बिनपैशाची कर्जमाफी अन् ऑनलाइच्या नावाखाली घोळात घोळ सुरू अाहे. असले सरकार कुणाच्या हिताचे? लोकहित साधणारा एकही निर्णय या सरकारांना घेता आला नाही. लाभार्थी म्हणून सामान्यांची चेष्टा करणाऱ्या या मंडळींनी धडा शिकवा, असा हल्लाबोल आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित निदर्शनेत त्या सहभागी झाल्या होत्या. कुंभार वेस येथे हे अांदोलन झाले. या वेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, विनोद भाेसले, विवेक कन्ना, माजी महापौर अलका राठोड, सैपन शेख, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, राहुल वर्धा उपस्थित होते

You might also like
Comments
Loading...