fbpx

काँग्रेस नेहरूंना तर भाजपा सावरकरांना विसरलेत !

Jawaharlal Nehru (1)

शाम पाटील ( औरंगाबाद) – काँग्रेस आणि भाजपा दोघेही आपल्या आपल्या विचारांवर ठाम नाहीत.गुजरात निवडणुक भाजपसाठी आणि काँग्रेस साठी अस्मितेचा विषय ठरलीआहे स्वतः पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात जर काँग्रेस सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाले तर भाजपसाठी तो मोठा पराभव असणार आहे तर दुसरीकडे संपूर्ण देशात सपाटून मार खाललेला काँग्रेस पक्ष जर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावून निवडणुकात उतरला आहे

congress bjp
file photo

काँग्रेस ने अनेक अस्त्र भापावर डागले पण भाजपाने तितक्याच शिताफीने त्यांना निकामी केले हार्दिक पटेल वर सर्वाधिक भरोसा काँग्रेस ने ठेवला पण त्याची सेक्स सीडी लोकांसमोर आली त्याला पर्याय म्हणून राहुल गांधी मंदिर मंदिर खेळू लागले पण राहुल यांचे मीडिया संयोजक मनोज त्यागी यांनी सोमनाथ मंदिरात राहुल यांच्या धर्माची नोंद अहिंदू म्हणून केली तेव्हा मात्र अनेक गोष्टी चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली नेहरू ते राहुल असा एक क्रम भाजपाने मांडायला सुरुवात केली आहे आता यात नेमकं कोण चुकतंय हेच या लेखातून पाहायचं आहे.

rahul at somnath temple
file photo

भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढीच संशयास्पद का वाटू लागली ? सावरकरांना आदर्श मानणाऱ्या भाजपाला सावरकरांनीच मांडलेली हिंदू धर्माची व्याख्या मान्य नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे जर भाजपा खरंच सावरकर विचारांनी चालणारी असेल तर मग त्यांनी सांगितलेल्या विचारांवर भाजपा का चालत नाही ?पहिल्यांदा भाजपा नेत्यांना सावरकरांची व्याख्या समजून सांगणे गरजेचे आहे आणि त्यानंतर राहुल गांधी हिंदू की अहिंदू या मुद्यावर बोलणं सार्थ ठरेल.
सावरकर हिंदू धर्माची व्याख्या करताना म्हणतात की

आसिंसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका |
पित्रूभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ||

वेद ह्या धर्म ग्रंथापासून त्याचे अनुयायांचे नांव वैदिक धर्मीय जसे पडले, बुद्ध या नावावररून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध पडले, जिनमताच्या अनुयायांचे नाव जैन, नानकाच्या धर्मशिष्याचे नांव जसे शिख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून पडलेले नसून आसिंधुसिंधु म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः लागू पडणारे आहे. आणि त्या अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.

rahul and modi

या साठीच हिंदु शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूळ ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभुमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात जन्मलेल्या धर्माच्या आणि संस्कृतीच्या बंधनांनी पालन करणारे राष्ट्र हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहीजे की,

आसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू
यातील पितृभू नि पुण्यभू हा शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा, थोडासा पारिभाषिक अर्थ आहे.

;पितृभू म्हणजे जिथे आपले आईबाप तेव्हढेच जन्मलेे ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज राहात आले ती, असा अर्थ होतो. काही जण लगेच शंका घेतात की, आम्ही दोन पिढ्या अमेरिकेत आहोत. मग आम्ही हिंदू नाही की काय? ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. हिंदूंनी साऱ्या पृथ्वीवर जरी वसाहती निर्माण केल्या असल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय आणि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू ही भारतभूमीच असणार आणि आहेच यात शंकाच नाही

savarkar
file photo

पूण्यभू;चा अर्थ इंग्लिश मध्ये होलीलँड असा होतो. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार किंवा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. या अर्थाने पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसती पवित्रभूमी हा त्याचा अर्थ नाही.

पितृभू नि पुण्यभू शब्दांच्या ह्या पारिभाषिक अर्थी हि आसिंधुसिंधु भारतभुमिका ज्याची ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमि आहे तो हिंदू!हिंदूत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच, आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच समर्पक ही आहे.

एवढं सगळं सावरकर सांगून जातात आणि भाजपा त्यांना आदर्श मानते तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरात गेलं म्हणून बिघडलं कुठं ? सोमनाथ मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवरच्या सूचना फलकावर स्पष्ट पणे लिहलेल आहे की भगवान सोमनाथ हे एक हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी हिंदू धर्मीयांशीवाय येणाऱ्या अन्य धर्मियांनी आपली नोंद करणे आवश्यक आहे.

GujaratElectio new
file photo

जेव्हा राहुल गांधी मंदिरात दर्शनासाठी जातात तेव्हा अहमद पटेल ही त्यांच्या सोबत होते जे की हिंदू नाहीत म्हणून त्यांची नोंद करायला गेलेल्या मनोज त्यागी यांनी राहुल गांधी यांच्या नावाची देखील त्याठिकाणी नोंद केली. म्हणजे राहुल गांधी हिंदू धर्माचे आहेत हे त्यांच्या मीडिया संयोजकाला सुद्धा माहीत नसाव का ? नसेल ही कारण जिथं ज्या धर्मियांची संख्या जास्त तिथं काँग्रेस त्या धर्माची झालेली आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी शीला दीक्षित यांना ब्राम्हण आहेत म्हणून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पुढे केले स्वतः राहुल गांधी यांनी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 26 वर्षांनी अयोध्येच्या मंदिरात दर्शन घेतले होते, का त्या आधी त्यांना राम आठवला नव्हता का ? हेच ते काँग्रेस आहे ज्यांनी भगवान श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

आणि आज ज्या गोष्टीमुळे राहुल गांधींचा धर्म कोणता हा प्रश्न निर्माण झाला आहे त्या सोमनाथ मंदिराच्या बांधकामाला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अंधश्रद्धा म्हणून विरोध दर्शविला होता एवढंच नाही तर डॉ राजेंद्र प्रसाद जेव्हा मंदिराच्या उद्घाटनला येणार होते तेव्हा नेहरूंनी जाहीरपणे आपला विरोध बोलून दाखवला होता. मग राहुल गांधी यांनी आपल्या पंजोबांच्या विचारांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे की काय ?

rahul gandhi and nehru
rahul gandhi and nehru

हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांनी काँग्रेस चे उपाध्यक्ष पद स्वीकारले तेव्हाच्या भाषणात जाहीर पण म्हटले होते की काँग्रेसपक्षाच्या रक्तात भारतीयत्व आहे काँग्रेस हिंदू किंवा मुस्लिमांचा नाही काँग्रेस सर्वधर्म समावेशक पक्ष आहे, मग गुजरात निवडणुकात असा एकदम यूटर्न का ? कारण गुजरातमध्ये हिंदूंची मते जास्त आहेत ? की मग भाजपाने हिंदुत्व हिंदुत्व म्हणून देशातील सत्ता मिळवली म्हणून काँग्रेस सुद्धा आता हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वतःला पुढे करत आहे की काय ? की मग भाजपाची धास्ती खाल्ली आहे ?

ज्या राहुल गांधींनी केरळ मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात चकार शब्द ही काढला नाही उलट त्यांच्या केरळच्या पदाधिकाऱ्यांनी गोहत्याबंदी विरोधात चालना दिली होती तोच काँग्रेस पक्ष आज हिंदुत्वाला साकडे घालत आहे. ते पण जानवे घालून आणि ते लोकांना दाखवून की पहा मी जानवे घातले आहे आणि मी हिंदू आहे, का बरं आशी वेळ का यावी राहुल गांधींवर ज्यांना स्वतःचा धर्म सिद्ध करण्यासाठी एवढ्या यातना सहन कराव्या लागतात, तर याला एक इतिहास आहे जे नेहरू स्वतःला अपघाताने हिंदू आहे नाहीतर मी कर्माने आणि संस्कृती ने मुस्लिम च आहे असं म्हणतात त्याच नेहरूंचे हे पंतू आहेत स्वतःला आतापर्यंत ख्रिश्चन म्हणवणारे राहुल कधी मुस्लिम समाजाला जवळ करण्यासाठी त्यांची मत खेचण्यासाठी जाळीदार टोपी परिधान करून जेव्हा दर्ग्यात जातात तेव्हा ते मुस्लिम असल्यासारखं भासवतात मग त्यांच्या धर्मासबंधी प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे.

rahul in templs
file photo

आणि मनोज त्यागी यांना ही नेमका कोणता धर्म लिहावा हा प्रश्न पडणे साहजिकच ठरते,
मग मुद्दा परत तिथेच येतो की भाजपने या मुद्द्याला एवढा जोर का लावावा जर भारतीय राज्यघटना भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करते, भारतातील कोणत्याही व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे, जर भाजपा राहुल यांना विरोध करत आहे तर ते त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे आहे, भाजपाची नेमकी द्विधा दिसून येत आहे, किंवा मग तुम्ही सावरकर यांचे विचार आणि भारतीय राज्यघटना यांना फाट्यावर मारून स्वतःचा राजकीय स्वार्थ साध्य करू इच्छित आहात आणि दुसरीकडे राहुल जर स्वतःला खरच शिवभक्त आणि हिंदू मानतात तर त्यांना प्रमाण देण्याची गरज नाही जर जानवे घालणारेच लोक हिंदू असते तर भारतात हिंदू धर्म अल्पसंख्याक म्हणून गणल्या गेला असता….

कोण काय करतो, कोण काय खातो, कोण कोणत्या जातीचा आणि कोण कोणत्या धर्माचा यावरूनच जर गुजरातमध्ये निवडणुका होतायत तर भारतीय लोकशाही आता धोक्यात येत आहे असे म्हणावे लागेल आणि सोबतच राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदावर येत असताना भाजपला शह देण्यासाठी म्हणून की काय हिंदुत्वाचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे असे दिसत आहे काँग्रेसच्या पुरोगामी विचारांचा छळ व्हायला लागलाय एवढं मात्र नक्की

गुजरातच्या विधानसभा निकालानंतरच कळेल की लोक कोणाला हिंदू धर्माचे प्रमाणपत्र देतात..
तोपर्यंत wait and watch !