औरंगाबादचा दख्खनी ताजमहाल-बिबी का मकबरा

update bibe ka makbara aurangabad

शाम पाटील -औरंगाबाद शहर म्हटल कि आपल्याला औरंगजेब आठवतो आणि  हे एक ऐतहासिक शहर असेल असा अंदाज आपण बांधतो तर बरोबर आहे . औरंगाबाद हे एक ऐतहासिक शहरच आहे, येथे वेरूळ अजिंठा लेण्यांसह बौद्ध लेण्या आणि औरंगजेब कालीन बऱ्याच अशा ऐतहासिक गोष्टी आहेत . ज्यामुळे तुम्ही पर्यटनासाठी औरंगाबाद शहराची निवड करू शकता. औरंगाबाद मध्ये प्रसिद्ध असलेला दख्खनी ताजमहल म्हणजे बिबी का मकबरा याबद्दल आपण जाणून घेऊयात.

updated bibi ka makbara aurangabad
file photo

बीबी का मकबरा मुगल सम्राट औरंगज़ेब (1658-1707 ईसवी) ची बेगम रबिया-उल-दौरानी उर्फ दिलरास बानो बेगम चा  एक सुंदर मकबरा आहे,  अस म्हटल्या जात कि हा मकबरा  राजकुमार आजम शाह याने आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ इ.स  1651 ते  1661 च्या काळात निर्माण  केला  आहे.  मुख्य प्रवेश द्वारा वर असलेल्या एका शिलालेखावर याच्या बांधकामा संबंधी उल्लेख आढळून येतो कि हा  मकबरा अताउल्ला नावाचा  एका  वास्तुकार आणि  हंसपत राय नावाच्या एका  इंजीनियराने याची कल्पना आणि  निर्मिती केली आहे. हा   मकबरा आगरा येथील जगप्रसिद्ध ताजमहलाची प्रेरणा घेऊन बनवला गेला आहे.  ज्याची निर्मिती इ.स 1631 ते  1648 च्या कालखंडात झाली. त्यामुळेच बीबी का मकबरा दख्खन चा ताजमहल म्हणून देखील ओळखल्या जातो .

हा मकबरा विशाल चौकोनी स्वरूपाचा आहे. जो अंदाजे  उत्तर-दक्षिण 458 मीटर आणि  पूर्व-पश्चिम 275 मीटर आहे. याच्या चारही बाजूंनी उंच मिनारे आहेत, ही वास्तू चारही मिनारांच्या केंद्र भागी आहे. विशिष्ट मुगल चारबाग पैटर्न मकब-याला शोभित करतो. याच प्रकारे याची एकरूपता आणि उत्कृष्ट कलाकृतीमुळे मकब-याच्या सौंदर्य आणि भव्यते मध्ये आणखीनच शोभा वाढते।  हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात याच्या शुशोभिकरणासाठी वेळोवेळी विशिष्ट काळानुसार बुरुज बांधले आहेत. याच्या भिंतीवरील छोट्या मिनारांना मुख्य घुमटापासून विभक्त ठेवलेले आहे.

या मकबऱ्यात दक्षिण बाजूने असणऱ्या लाकडी दरवाज्यातून प्रवेश करता येतो या दरवाज्यावर पितळी पत्रीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आत प्रवेश केल्यानंतर एक छोटासा जलकुंड आणि संरक्षक भिंती आहेत ज्या मुख्य वास्तुपर्यंत पसरलेल्या आहेत. आवरण असणऱ्या या मार्गाच्या मधोमध कारंज्यांची रांगच आहे ज्यामुळे येथील वातावरण अधिकच रमणीय बनते

updated bibi ka makbara aurangabad
file photo

हा मकबरा एक उंच-वर्गाकार ओट्यावर उभा आहे,  याच्या चारही बाजूंनी उंच मिणारे वर उल्लेख केल्याप्रमाणे आहेत  यामध्ये तीन बाजूंनी  झिन्याच्या माध्यमातून जाता येते,  मुख्य इमारतीपासून  पश्चिमेला एक मस्जिद आहे जिची निर्मिती  हैद्राबादच्या  निजामांनी नंतर केली आहे, त्यामुळे या बाजूला असणारा प्रेवश दरवाजा  बंद झाला आहे, या मकबऱ्याच्या  खालच्या भिंती  संगमरमर आणि घुमटापर्यंत बेसाल्ट पासून बनलेल्या आहेत, आणि घुमटपण संगमरमरा पासून बनलेला आहे. सिमेंट च्या प्लास्टरने  बेसाल्टला झाकलेले आहे आणि याला  पॉलिश पासून चकाकणारे बनवले आहे आणि लहान लहान फरशीच्या अलंकारा पासून याची सजावट केलेली आहे.

रबिया-उल-दौरानी चा मृतदेह याच्या खाली दफन केलेला आहे, अत्यंत सुंदर डिजाइन पासून एका  अष्टकोणीय संगमरमर दगडापासून तिची कबर बनवलेली आहे ज्याच्यापर्यंत झिन्याने जाता येते . मकबऱ्याच्या भूमिगत असणाऱ्या या खोलीच्या छताला अष्टकोणीय विवरातून पाहता येते, याची खालची सुरक्षा करता यावी म्हणून संगमरवराचे  आवरण बनवलेले आहे.

गुलाम मुस्तफाच्या तवारीखनाम्या नुसार मकबरचा निर्मिती खर्च इ.स  1651-1661 मेंमध्ये 6,68,203-7 रूपए (सहा  लाख, अडोसष्ट हजार दोनशे  तीन रूपये  आणि  सात आणे) असा आहे

 

 Loading…
Loading...