भन्साळींना यापुढे एकाही चित्रपटाचं शुटिंग करु देणार नाही – राम कदम

Shahid-Kapoor-Padmavati-Ghoomar-Deepika-Padukone

टीम महाराष्ट्र-  पद्मावती चित्रपटाची रिलीज डेट जसजशी जवळ येऊ लागली आहे त्याप्रमाणे वाद वाढू लागल्याचं दिसत आहे. सध्यातरी हा वाद शमण्याची कोणतीही चिन्हं दिसत नसून आता भाजपा आमदार राम कदम यांनीही चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे. राम कदम यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सोबतच इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना पाठिंबा देणार नाही हेदेखील स्पष्ट झालं आहे.

राम कदम यांनी फिल्म स्टुडिओ अलाइड मजदूर युनियनच्या माध्यमातून याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. राम कदम यांनी दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी चित्रपटात बदल न केल्यास येथून यापुढे त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होऊ देणार नाही अशी धमकीच दिली आहे.

‘आज संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ. इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणार आहोत. जर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी बंदीची मागणी मान्य केली नाही तर यापुढे आमची संघटना त्यांना कोणत्याही चित्रपटाचं शुटिंग करु देणार नाही’, असं राम कदम बोलले आहेत.

.