मुख्यमंत्र्यांची थेट जनतेतून निवड करण्याची हिंमत भाजपने दाखवावी – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा –बीड गावपातळीवर सरपंच निवड थेट जनतेतून जशी केली तशीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची हिंमत सत्ताधारी भाजप सरकारने दाखवावी, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले. माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी मुंडे बोलत होते. जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच जसे निवडून आणले तसेच राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडून आणण्याची हिंमत दाखवावी. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टिका करताना राज्याच्या ग्रामविकास मंत्री आसताना गोपीनाथ गडाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला असून ग्रामपंचायतीची खोटी आकडेवाडी देत आहेत, असे मुंडे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...