जयभवानी कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे हा पंकजा मुंडे यांचा पूर्वनियोजित कट- आ. पंडीत

टीम महाराष्ट्र देशा –  जयभवानी कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हे हा पंकजा मुंडे यांचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप आ.अमरसिंह पंडित यांनी केला असून अनियमिततेला गुन्हयाचे स्वरूप दिल्याची टीका त्यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे असले राजकारण करत नव्हते अस ही ते म्हणाले जयभवानी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाल्या नंतर जिल्हाचे राजकारण चांगलेच तापले काल अंतरिम जमीन या प्रकरणात मिळाली तेव्हा आज आ. पंडित यानी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सुडाच राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.

माजी मंत्री शिवाजीराव पंडित 15 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत; परंतु त्यांना या प्रकरणात नाहक गोवल्याचा आरोप त्यांनी केला. कारखान्याने जिल्हा बँकेची अथवा इतर कोणाची कधीच फसवणूक केली नसल्याचे स्पष्टीकरण पंडित यांनी दिले.2013 मध्ये गहाणखत देऊनही बँकेने मालमत्तेवर बोजा चढविला नाही. तथापि, कारखान्याने स्वत:हून पत्रव्यवहार करुन ही बाब बँकेच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर 26 सप्टेंबर 2017 रोजी कारखान्याने शिवाजी काकडे यांची जमीन खरेदीखताआधारे पुन्हा मालकीची करुन घेतली. संचालक मंडळाच्या सभेत तसा ठराव घेऊन जिल्हा बँकेची दिलगीरी व्यक्त करण्याचा ठरावही झाला. 25 ऑक्टोबर 2017 रोजी याबाबत पत्राद्वारे बँकेला अवगत केले होते. याउपरही जिल्हा बँकेने कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हे नोंद केले. कारखाना सुरळीत झाल्यास कर्जपरतावा नियमितपणे करण्यात येणार आहे. असे ते म्हणाले.