बागलांनी भाऊंचा केसाने गळा कापला : नारायण पाटील

करमाळा – डीगा बागलाला भाऊंनी अगदी दिलदार मनाने प. स. चा सभापती केला पण याच बागलांनी भाऊंचा केसाने गळा कापला.पूढे काय इतिहास घडला हे तुम्हाला माहीत आहे असं म्हणत करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी बागल गटावर टीका केली. देशभक्त नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलच्या जेऊर येथील प्रचारसभेत ते बोलत होते.आदिनाथ व मकाई कारखान्याची जप्ती आणलेल्या बाजार बुणग्या बागलांनी मध खाल्ल्यासारखे बोलून, गालगुच्चे धरून जनतेला फसवू नये असा टोला देखील त्यांनी लगावला.

यावेळी सुनिल तळेकर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन व आभार मानले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब भोसले बप्पा हे होते. यावेळी उमेदवार प्रा. शिवाजीराव बंडगर, माढा तालुक्यातील प्रा.ननवरे , शिवसेना जिल्हा उपप्रमूख महेश चिवटे, प्रा. संजय चौधरी,विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. यावेळी व्यासपिठावर विदयमान आमदार नारायण आबा पाटील, पॅनल प्रमूख व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमूख, उपसभापती प. स. गहिनिनीनाथ ननवरे,प.स. सदस्य अतूल पाटील, करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, जि.प. सदस्य बिभिषण आवटे,आदिनाथचे जेष्ठ संचालक धुळाभाऊ कोकरे, राजाभाऊ कदम, सरपंच भारत साळवे,प.स. सदस्य दत्ता सरडे, शिवसेना नेते महेश चिवटे, प्राचार्य जयप्रकाश बिले, बाजार समितीचे संचालक देवानंद बागल, दत्ता गव्हाणे, प्रा. संजय चौधरी, महेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, पंडीत वळेकर, रोहिदास सातव, नितीन हिवरे, बाळासाहेब काळे, सरपंच रामभाऊ नलवडे ,अरूण यादव, महादेव डूबल,युवा नेते पृथ्वीराज पाटील, वैजिनाथ कदम, सागर दोंड,रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, सरंपच दादा कोकरे, गोरख लबडे, दशरथ दडस, आदी उपस्थित होते.

नारायण पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
– जयवंतराव भाऊ नी मला मी तालीम करून आल्यावर मार्केट कमिटीच्या माध्यमातून काम करण्याची पहिल्यांदा संधी दिली.
– भाऊंना जेव्हा -जेव्हा गरज पडली तेव्हा -तेव्हा धाकटा भाऊ म्हणून खंबीर पणे उभा राहिलो आहे.
– घातकी मित्रा पेक्षा पक्का वैरी चांगला असे म्हणतात. एकत्र आल्यावर निकाल काय लागतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे.
– शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेत पाठवण्यासाठी मदत केली. बागलांच्या वैचारिक पातळी बालीश पणाची व किळस वाटणारी आहे.
– मार्केट कमिटीच्या जवळपास ७० वर्षाच्या कारकिर्दीत आजपर्यंत कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. अतिशय पारदर्शक कारभार चालु आहे. आदिनाथ व मकाई कारखान्याची जप्ती आणलेल्या बाजार बुणग्या बागलांनी मध खाल्ल्यासारखे बोलून, गालगुच्चे धरून जनतेला फसवू नये.
– ज्यांच्यामूळे तुम्ही राजकारणात आला त्यांचे ऋण फेडण्या ऐवजी त्यांच्याशी गद्दारी करता , नियती तुम्हाला सोडणार नाही.
– मोलॅसस, साखर विक्रीत घोटाळा, शेतकऱ्यांच्या उसाची बिले, वाहतूकदारांच्या नावावर कर्जे काढली, कामगारांच्या पगारी ३० माहिन्यापासून थकवल्या आहेत. दोन्ही कारखान्यावर जप्तीची वेळ या बागलांनी आणली अन् सोन्यासारखे कारखाने शेवटच्या घटका मोजत आहेत.
– आमदार म्हणून उजनी कडेच्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत.२ तासाची वीज ५ तास करून लोड शेडींग चा प्रश्न सोडवला. प्रलंबीत कामे यात रस्ते, वीज , पाणी इ. अवघ्या ४ वर्षात मार्गी लावली. कोळगाव . धरण भाऊ नी प्रस्ताव दाखल केला व मी उपसा सिंचन मी चालु केले. रेल्वे उड्डाण पूल बांधला, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र उभारले आहे.विकासाच्या व तत्वाच्या बाजूने रहा व चांगले .
– जगताप गटाच्या संस्था बळकावण्याशिवाय काहीही बागलांनी काहीही केलेले नाही. चुकीच्या लोकांना निवडूण देवू नका.
– माढ्याच्या शिंदयांनी एवढं खाल्लं की खाऊन- खाऊन यांना मुडदूस झालं. बंधाऱ्याची दारं बसवायचं टेंडर रणजीत सिह मोहिते पाटलांकडून घेणाऱ्या शिंदे नी माढयात दहशत निर्माण करून बिहार केलाय, अशांना मत दयाल तर स्वातंत्र्य गमवून बसाल.
– जयवंतरावांनी बाजार समितीचे सभापती म्हणून २९ वर्षात स्वच्छ कारभार केला आहे. भविष्यातही भाऊ ही संस्था चालवण्यासाठी सक्षम आहेत म्हणून जगताप- पाटील यूतीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतानी विजयी करा. 

जयवंतराव भाऊ अन् मी एकत्र आल्यावर निकाल काय लागतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे : नारायण पाटील