भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याने लेखिकेला अटक…

टीम महाराष्ट्र देशा : तामिळनाडूमध्ये भाजपविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या एका लेखिकेला अटक करण्यात आली आहे. या अटकेवरून आता तामिळनाडूमधील राजकारण चांगलेच तापले आहे. ही अटक लोकशाही व व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला घालणारी असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप ‘डीएमके’चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केला आहे. लूई सोफिया असं अटक करण्यात आलेल्या लेखिकेचे नाव आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा तमिलसाई सुंदरराजन यांच्यासमोर या महिलेने भाजपविरोधात घोषणाबाजी केली होती.

bagdure

दरम्यान, तूतीकोरिन विमानतळावर सामान घेण्यासाठी लूई आणि सुंदरराजन आमनेसामने आल्यानंतर लूई सोफिया यांनी ‘भाजप सरकार हाय-हाय’, असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती. घोषणाबाजीवरून लूई आणि सुंदरराजन यांच्यात खडाजंगी सुद्धा झाली होती. त्यानंतर सुंदरराजन यांनी लूईविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. सुंदरराजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लुई सोफिया यांना अटक केली व कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने सोफिया यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली व त्यांची कोकिराकुलम जेलमध्ये रवानगी केली.

You might also like
Comments
Loading...