ऑस्ट्रेलियात भारतीय बाजेचा बोलबाल ; किमंत ऐकून व्हाल थक्क.

भारतीय जगभरातील महागड्या वस्तूच्या मागे धावतात पण भारतीय पांरपारिक बाजेची मात्र ऑस्ट्रेलियात धूम सुरु आहे.

आपल्याकडे एक खूप जुनी म्हण आहे जुन ते सोन. पण आता ही म्हण फक्त भाषेत वापरण्यापूर्ती मर्यादित आहे . आपण भारतीय पारंपारिक वस्तू सोडून हायटेक उत्पादनांच्या मागे धावत आहेत. तर दुसरीकडे इतर विकसीत देश भारतीय पारंपारिक वस्तू स्विकारत आहेत.

याचं एक ताजं उदाहरण म्हणजे भारतातील चारपाई म्हणजेच खाटेला किवां बाज  ऑस्ट्रेलियात जोरदार मागणी वाढली आहे.आपल्याकडे बाज आधीच्या काळात झोपण्यासाठी वापरायचे पण काळ बदलत गेला आणि बाजाची जागा सो कॉल्ड बेडने घेतली. बाज आता फक्त धाब्यावर जेवणापुरते मर्यादित राहिले आहेत. पण ऑस्ट्रेलियात नारळाच्या दोरीपासून आणि लाकडाच्या फ्रेमपासून तयार करण्यात आलेल्या खाटेची जाहिरात चांगलीच गाजत आहे. ऑस्ट्रेलियातील या जाहिरातीने भारतीय ट्विटर यूजर्सना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. हा धक्का खाटेला तिथे मागणी वाढल्यामुळे नाही तर खाटेची किंमत पाहून बसला आहे.

या जाहिरातीत एका खाटेची किंमत ९०९ डॉलर इतकी देण्यात आली आहे. म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये ही किंमत ५० हजार रूपये इतकी आहे. या जाहिरातीत खाटेला पारंपारिक भारतीय डे-बेड सांगण्यात आलं आहे. आणि हा बेड अतिशय आरामदायक असल्याचा दावाही करण्यात आलाय. ही खाट शंभर टक्के ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.