fbpx

औरंगाबादचा कचराप्रश्न सुटता सुटेना

garbage-aurangabad

औरंगाबाद- गेल्या  २० दिवसांपासून औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असून त्याचे रूपांतर काल भीषण दंगलीमध्ये झाले. त्या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेचा कचरा नारेगाव येथे टाकण्यावरून आंदोलन चालू आहे. काल या आंदोलनाला हिसंक वळण लागून पोलिसांनी गोळीबार केला. आज पडेगाव मध्ये पोलिसांनी नागरिकांवर दगडफेक केली.

Clash On Garbage Dumping Yard Issue At Aurangabad

मुख्यमंत्र्यांनी नारेगाव ऐवजी खदानीमध्ये कचरा टाकण्यासाठी सांगितले आहे. पण खदाणीसाठी ज्या मार्गावरून जावे लागते, त्या मार्गालगतच्या गावकऱ्यांनी कचर्‍याचा एकही ट्रक जाऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. या गंभीर प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उत्तर दिले व यावर उद्या चर्चा करण्याचे मान्य केले.

काय आहे प्रकरण

नारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपण्याच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायलयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कपंणीना देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत.