इंजिनच्या धुरात गुदमरून पिता-पुत्रासह अन्य एकाचा मृत्यू

smoke

टीम महाराष्ट्र देशा – डिझेल इंजिन दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या   तिघांचा ;डिझेल इंजिनच्या धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील दैठणा गावात काल (मंगळवार) रात्री उशिरा ही घटना घडली. मृतांमध्ये पिता-पुत्रासह गावातील अन्य एका युवकाचा समावेश आहे. तर या तिघांना वाचविण्यासाठी गेलेले इतर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

बाबासाहेब बापुराव वाबळे (वय-45), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (वय-30) व अर्जुन साहेबराव धांडे (तिघेही दैठणा, ता.घनसावंगी) अशी मृतांची नावे आहेत. महावितरणने शेतीपंपाची वीज बंद केल्याने पिकांना पाणी देण्यासाठी बाबासाहेब वाबळे यांनी त्यांच्या शेतावरील विहिरीवर डिझेल इंजिन बसविण्याचा निर्णय घेतला, इंजिन बसवल्या नंंतर बराच वेळ इंजिन मधून पाणी येत नसल्याने पाणी का येत नाही हे पाहण्यासाठी बाबासाहेब वाबळे आपल्या मोठ्या मुलासह (रामेश्वर वाबळे) विहिरीत उतरले विहीर खूपच अरुंद असल्याने इंजिन मधून निघणारा धूर विहिरीत मोठ्या प्रमाणात साठला गेला.

त्यामुळे हे दोघ बेशुद्ध झाले व पाण्यात पडले बेशुद्ध अवस्थेत पाण्यात पडल्याने दोघांचा ही मृत्यु झाला, बराच वेळ झाला हे दोघे वर का येत नाहीत हे पाहण्यासाठी अर्जुन धांडे विहिरीत उतरले त्यांना सुद्धा या धुरामुळे बेशुद्धी आली त्यांचा देखील बेशुद्ध अवस्थेत पाण्यात पडून मृत्यू झाला यानंतर काही वेळाने वाबळे यांचा लहाना मुलगा (परमेश्वर वाबळे) जो विहिरीच्या जवळ थांबलेला होता तो देखील खालचे लोक वर का येत नाहीत हे पाहण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याच्यासोबत आसाराम वाबळे हे देखील विहिरीत उतरले त्यांची देखील तीच अवस्था झाली

पण शेतातील आजूबाजूला असलेले लोक आल्याने विहिरीतील पाचही लोकांना वर काढले तेव्हा . त्यात बाबासाहेब वाबळे,रामेश्वर वाबळे व अर्जुन धांडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर परमेश्वर वाबळे व त्यांना वाचविण्यासाठी गेलेले आसाराम बापुराव वाबळे हे दोघे जखमी झाले असुन त्यांच्यावर जालना शहरातील खासगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.Loading…
Loading...