fbpx

औरंगाबाद महापालिकेला नगर विकास खात्याचा ‘ठेंगा’

अभय निकाळजे ( वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : ऐतिहासीक वारसा सांगणाऱ्या शहराची ऐतिहासीक महानगर पालिका आहे. तिजोरी खाली तरी आमचा तोरा काही कमी नाही. संत एकनाथ रंगमंदिराच्या दूरूस्तीचा स्थानिक रगकर्मी आणि काही नाट्यप्रेमीनी हाती घेतला होता. त्यांच्या मागण्या लगेच पुर्ण करू अशा अर्विरभावात नंदूशेटनी अश्वासन दिले खरे, पण नगर विकास खात्याने दुरुस्तीसाठी निधी देता येत नसल्याचे सांगून महानगर पालिकेला ‘ठेंगा’ दाखविला.

मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने संत एकनाथचा व्हीडीओ करून तिथल्या समस्या आणि नाटक करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा पाठवा जगाच्या समोर वाचला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरेंपासून ते महापौर नंदूशेटपर्यत सगळ्यांनी संत एकनाथला भेट देऊन दुरुस्तीसाठी किती निधी लागतो, याचा अंदाज घेतला. जी महानगर पालिका त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करू शकत नाही, जी महानगर पालिका नागरिकांना मुलभुत सुविधा स्वतःच्या हिमतीवर देऊ शकत नाही, ती महानगर पालिका संत एकनाथ दुरूस्त कसे काय करू शकेल.

गेल्या महिन्यात रंगकर्मींनी दुरुस्तीसाठी बैठका घेतल्या. त्यांनी इशारा दिल्यावर नंदूशेटनी बैठका घेतल्या. दूरूस्ती योग्य पद्धतीने व्हावी म्हणून स्थानिक अभिनेता मंगेश देसाईंची निवड केली. ही निवड झाल्यानंतर दुरूस्तीची निविदा प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. पण त्या दुरुस्तीसाठी मंगेश देसाईंनी पाठपुरावा करण्यासाठी महानगर पालिकेत चौकशी केली तर दस्तुर खुद्द अभियांत्रीकी शाखेला मंगेश देसाईंची नियुक्ती कश्यासाठी झाली हेच माहीत नव्हते. या कारभाराची कल्पना मंगेश देसाईंना होती. म्हणून त्यांनी पाठपुरावा करणे सोडले.

नंदूशेटना संत एकनाथच्या दुरुस्तीसाठी निधी पाहीजे होता. त्यांनी थेट मंत्रालयातील नगर विकास खाते गाठले आणि झोळी पसरली. पण यापुर्वी अशाच फुटकळ कामांसाठी निधी दिल्याने त्यावर लेखा विभागाने ताशेरे ओढले होते. त्यामुळे आता निधी न देता ‘ठेंगा’ दाखविला. महापालिका स्टाईल नंदूशेटनी तिथे आदळआपट करून पाहीली. तेव्हा त्यांना नगर विकास खात्याने ‘डीपीडीसी’तुन पालकमंत्र्यांना साकडे घालून निधी मागण्याची आयडिया दिली. त्यामुळे संत एकनाथचे पालकत्व महापालिकेकडे असूनही दुरुस्तीसाठी निधी नसल्याने अनाथासारखी झाली आहे.

अभिनेता सुमित राघवणने फेसबुक लाईव्हवर दाखविली होती नाट्यगृहाची दूरवस्था

काही दिवसापूर्वीच अभिनेता सुमीत राघवनने शहरातील संत एकनाथ रंगमंदीर येथील गलिच्छ अवस्था फेसबुक लाईव्ह व्हिडिओद्वारे सर्वांसमोर आणली होती. तुटलेल्या खुर्च्या इतकेच काय ज्या स्टेजवर उभे राहून कलाकार सर्वांसमोर सादरीकरण करतात तो स्टेजही तुटलेल्या अवस्थेत व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुमीत रावनसोबत अभिनेत्री स्वानंदी टीकेकरही होती .
सुमीतने नाट्यमंदीरातील स्टेज, कलाकारांचे मेकअप रुमही यात लाईव्ह दाखवला. यामध्ये नाट्यमंदीरातील जीर्ण झालेल्या खुर्च्या, तुटलेले लाकडी स्टेज जिथे कलाकारांना उभे राहण्यासही भीती वाटत होती. स्त्रियांच्या मेकअपरुममधील अस्वच्छता, जागोजागी थुंकलेले तसेच अत्यंत घाण अवस्थेतील टॉयलेट होते. पुरुषांच्याही मेकअपरुमची याहून वेगळी काही अवस्था नव्हती. यानंतर  सुमित राघवणने  पुन्हा येथे प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला.