जाहिरातीतून पप्पू शब्द वगळा निवडणूक आयोगाने भाजपला सुनावले

papu

टीम महाराष्ट्र देशा – सध्या गुजरात निवडणुकीमुळे गुजरातसह देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप कॉंग्रेस व राहुल गांधीना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. राहुल गांधींवर भाजपाने निशाणा साधला आहे.निवडणूक आयोगाने भाजपला Gujarat Assembly Election गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘पप्पू’ नावाचा वापर करण्यास आक्षेप नोंदवला आहे.

Loading...

गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर रोजी मतदान तर दि. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस दरम्यान आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने भाजपला एक पत्र पाठवून निवडणूक प्रचाराशी निगडीत वाहिन्यांवरील जाहिराती, होर्डिंग, पोस्टर आणि बॅनर आदिंवर ‘पप्पू’ नावाचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

भाजपने आपल्या प्रचार साहित्यावरून पप्पू नाव हटवण्यास सांगितले आहे. गुजरात निवडणूक आयोगानुसार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधणे मर्यादेचे उल्लंघन केल्यासारखे आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार साहित्याचे परीक्षण केल्यानंतर म्हटले की, यामध्ये एका खास व्यक्तिमत्वाकडे इशारा करत ‘पप्पू’ शब्दाचा अपमानजनक वापर केला जात आहे.

भाजपने गुजरात निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या प्रचार साहित्यात कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगाचा हा आदेश योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे

 Loading…


Loading…

Loading...