fbpx

हे आहेत क्रिकेट जगातील सर्वात चलाख खेळाडू

indian-cricket-team-

 टीम महाराष्ट्र देशा-टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.या पार्श्वभूमीवर आशिष नेहराने त्यांच्या करियर मधील अनेक रोमांचकारी घटना शेअर केल्या . अनेक प्रश्नांचीउत्तरे देखील दिली.

 शेवटचा सामना त्याचं होमग्राऊंड असलेल्या नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात खेळला जात आहे. ३८ वर्षांच्या आशिष नेहरानं करिअरमध्ये १७ कसोटी, १२० वन डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.

आशिषचा अनुभव पाहता त्याला चांगल्या खेळाडूंची चांगलीच पारख असेल हे मान्य करावंच लागेल. याच अनुभवातून त्याने टीम इंडियातील दोन खेळाडूंना सर्वात चलाख असल्याचे म्हटले आहे. यातील एक नाव म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. तर दुसरं नाव एकेकाळी आपला करिश्मा दाखवणा-या अजय जडेजाचं आहे.

नेहरा म्हणाला की, “अजय जडेजाच्या क्रि केट कौशल्याचा मी खूपच सन्मान करतो. माझ्यासाठी एम एस धोनी आणि अजय जडेजा हे क्रिकेट जगतातील सर्वात हुशार बुद्धीमत्तेचे खेळाडू आहेत”.