…तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी

ovasi mim

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात विधानसभा निवडणुकीआधी पाटीदार नेता हार्दिक पटेलने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हार्दिक पटेलच्या भूमिकेवर टीका करत मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ओवेसी यांनी ट्विट केलं आहे की, ‘काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत’. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिमांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमसारखी परिस्थिती झाल्याचाही उल्लेख केला.

हार्दिक पटेलची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर असदुद्दीन ओवेसी बोलले की, ‘हार्दिक पटेलने सांगितलं की, काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागासलेल्या मुस्लिमांसाठी नाही. याचे अनेक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. पण मुस्लिम राजकीयदृष्या मजबूत नाहीये, आणि दुबळ्या लोकांना शांत बसायला सांगितलं जातं’.