माधव भंडारींसारखे नेते नको तर लाड आणि राणेंसारखे भ्रष्टाचारी नेते भाजपला हवे- अंजली दमानिया

anjali damaniya

टीम महाराष्ट्र देशा –  छगन भुजबळ यांचा अचानक भाजपाला पुळका येत आहे . भाजपाचे मंत्री जाहीर कार्यक्रमात भुजबळाचे गुणगान गात आहेत या पार्श्वभूमीवर भाजपवर चौफेर ठिका होत आहे.माधव भंडारींसारखे नेते नको तर प्रसाद लाड आणि नारायण राणेंसारखे भ्रष्टाचारी नेते भाजपला हवे, असा घणाघातही आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय आहे.छगन भुजबळ यांना बाहेर काढून भाजपमध्ये घेतील. भाजपला पैसे घेऊन येणारे राजकीय नेते पाहिजेत असे देखील दमानिया म्हणाल्या

तर दुसरीकडे भुजबळांविषयी केलेलं वक्तव्य हे दिलीप कांबळे यांचं वैयक्तिक मत असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. कांबळे भुजबळांविषयी नेमकं काय बोलले हे माहित नसल्याचं सांगत त्यांनी हात वर केले.