कोथळे प्रकरणी नांगरे पाटलांची धडक कारवाई ; पोलिस उपनिरीक्षकासह अन्य पाच पोलीस बडतर्फ

टीम महाराष्ट्र देशा – सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीत अनिकेत कोथळेचा मृत्यू आणि प्रकरण दडपून टाकण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी, निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह आणखी पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईचा अहवाल राज्याचे पोलिस महासंचालक यांनाही सादर करण्यात आला आहे.

पीएसआय युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावं आहेत. लाड, टोणे, शिंगटे आणि मुल्ला यांना बडतर्फ करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांना असल्याने नांगरे-पाटील यांनी पोलिसप्रमुख शिंदे यांना बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर पोलिस उपनिरीशक युवराज कामटेच्या बडतर्फीचे आदेश स्वतः काढले.

 

You might also like
Comments
Loading...