fbpx

सत्तेसाठी काहीपण, अमित शहा शिकले तब्बल चार प्रादेशिक भाषा

amit shah

टीम महाराष्ट्र देशा – राजकारणी आणि सत्तेसाठी चालत असलेला आटापिटा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मतदार दात्याला आपला प्रतिनिधी आपलासा वाटावा याकरिता राजकारणी अनेक खलबत्ते करती असतात. अशीच खलबत्ते सध्या भाजपाच्या कोट्यात सुरु आहेत. दक्षिण भारतीय मतदार दात्यांना खुश करण्यासाठी भाजपा नेते अमित शहा हे  नवीन चार प्रादेशिक भाषा शिकत आहेत.

केंद्रासह देशातील विविध राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. या दोन्ही राज्यातील लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून त्यांच्यापर्यंत भाजपची विचारधारा पोहचविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे थेट बंगाली आणि तामीळ भाषा शिकले आहेत. गेल्या वर्षभरापासून ते या दोन्ही भाषा शिकत असून या भाषांमध्ये सहज बोलू शकतील इतके ते पारंगत झाले आहेत.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील जनतेशी संवाद साधण्यासाठी अमित शहा यांनी औपचारिकपणे या भाषा शिकायला सुरूवात केली आहे. याशिवाय गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या शेड्यूलमुळे व्यस्त असूनही त्यांनी मणिपुरी आणि आसामी भाषा सुद्धा शिकण्यास सुरूवात केली आहे. अमित शहा उत्कृष्टपणे हिंदीतही संवाद साधतात. त्यामुळे त्याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. तुरूंगात असताना आणि कोर्ट कचेरी करताना ते हिंदी शिकले. या शिवाय गुजरातमध्ये येण्यास त्यांना दोनवर्षाची बंदी घालण्यात आली होती.

शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर देशभर दौरे केल्यामुळे लोकांशी हिंदीतच संवाद साधावा लागत असल्याने त्यांची हिंदीवर चांगली पकड जमल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुभाषी असलेले अमित शहा यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यासही केलेला आहे. तसेच ते नियमित योगाही करत असतात, असं सूत्रांनी सांगितलं.