आम्ही तरी बोलका पंतप्रधान निवडून दिला पण तुम्ही…अमित शहांचा कॉंग्रेसला टोला

Amit Sahah

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. आरोप- प्रत्याआरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा देखील गुजरात निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले आहेत.

‘राहुल गांधी विचारत होते की, मोदींनी साडेतीन वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या, पण आम्ही पहिली गोष्ट ही केली की, बोलका  पंतप्रधान आम्ही निवडून दिला. यांनी तर असा नमुना दिला जो दहा वर्ष बोललाच नाही. मनमोहन सिंह यांना बोलताना तुम्ही ऐकलंत कधी?’ अशी टीका अमित शाहांनी आपल्या भाषणातून केली.

काँग्रेसनं पंतप्रधानपदी 10 वर्ष नमुना बसवला.’ असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे. ते गुजरातमधील एका प्रचार सभेत ते बोलत होते.दरम्यान, अमित शाहा यांच्या टीकेनंतर आता काँग्रेस भाजपला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Loading...