इतिहास बदलला तरी गांधी पुसता येणार नाही- अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा –  नागपुरातील लोकांनी इतिहास बदलविण्याचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य जनतेच्या हृदयात असलेल्या इंदिरा गांधी यांना पुसुन टाकत येणार नाही़ महात्मा गांधी यांनी देशाला दिलेला विचार यांना संपविता येणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नागपुरात केले.

Loading...

शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्या कतृत्वावर प्रकाश टाकला. गरिबांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी निर्णय घेतले. गरिबी हटाव कार्यक्रम राबविला़ सर्वसामान्यांसाठी बँकांचे राष्ट्रीयकरण केले़ मात्र, आता देशात गरीब हटविण्याचा कार्यक्रम सुरू आहे़ मोजक्या श्रीमंत उद्योगपतींसाठी सरकार निर्णय घेत असल्याचे सांगत चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली़ ते पुढे म्हणाले, इंदिरा गांधी यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आता भाजपाला ‘चले जाव’चा नारा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र यावे लागेल़ आज, गांधी घराण्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून पुसण्याचा प्रयत्न होत आहे़ इतिहास बदलविण्यासाठी धडपड सुरू आहे़ मात्र, अशाने लोकांच्या मनातील गांधी पुसता येणार नाही, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.Loading…


Loading…

Loading...