मोदींनीच केले’ होते ’‘आयसिसचा हस्तक काम करत असलेल्या त्या रुग्णालयाचे उद्घाटन

ahmad patel

टीम महाराष्ट्र देशा – आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधील एका तरूणाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला होता. मात्र,

अहमद पटेल यांनी बुधवारी जंबुसार येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपवर त्यांच्याच डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. आयसिसशी संबंध असल्याच्या संशायवरून अटक करण्यात आलेला तरूण ज्या रूग्णालयात काम करत होता, ते रूग्णालय एका भाजप नेत्याचेच आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच रूग्णालयाचे उद्घाटन केल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले.

Loading...

भाजप नेते दहशतवादाबद्दल बोलतात. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी दहशतावादाची झळ अनुभवली आहे. भाजपच्या आरोपानंतर मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा आयसिससशी संबंधित हा तरूण भाजप नेत्याने सुरू केलेल्या रूग्णालयात काम करत असल्याची माहिती समोर आली.

या रुग्णालयाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, आता गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने नैराश्य आलेले भाजप नेते माझ्या खासदारकीचा राजीनामा मागत आहेत. राज्यसभेची निवडणूक मी काँग्रेस आमदारांच्या बळावर जिंकली. त्यामुळे याबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो न्यायव्यवस्थेला घेऊन द्यावा, असे पटेल यांनी सांगितले.

त्यामुळे आता भाजप पटेल यांच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने आयसिसच्या दोन संशयितांना अटक केली. त्यापैकी एक आरोपी कासिम स्टिंबरवाला हा भडोच जिल्ह्य़ातील अंकलेश्वर येथील सरदार पटेल रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून कामाला होता, अशी माहिती पुढे आली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार