fbpx

समृद्धी बाधित शेतकऱ्यांची शासनाविरोधात वज्रमुठ

samrudhi mahamargh

टीम महाराष्ट्र देशा – इगतपुरी तालुक्यात शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष कचरू डुकरे यांनी समृद्धी महामार्गास स्वतःहून जमीन खरेदी दिली असताना शेतकरी संघर्ष समिती आक्रमक होत बैठक घेतली असून डुकरेंचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राजाराम साळवी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून भास्कर गुंजाळ यांच्या नावाची सूचना पांडुरंग वारुंगसे यांनी आणली तर रतन लंगडे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी न्यायालयीन लढा चालू आहेच मात्र रस्त्यावरील लढाईत डुकरे पाटलांनी साथ सोडली मात्र कृती समितीचे त्यांच्या एकट्याने जाण्याने कोणतेही नुकसान झाले नाही तर येणाऱ्या काळात लढा अजून तीव्र करणार असल्याचे अरुण गायकर यांनी स्पष्ट केले.तालुक्यातील १२९३ शेतकरी व ४३६ हेक्टरपैकी आत्तापर्यंत फक्त दीडशे लोकांनी ५१ हेक्टर जमीन संमतीने दिली आहे मात्र अजूनही हजाराच्यावर लोकं कृती समिती सोबत आहेत न्यायालयातील लढा देखील चालू आहे येणाऱ्या काळात लढा अजून तीव्र करण्यात येईल जरी डुकरे पाटील यांनी खरेदीसाठी जमीन दिली मात्र त्यांच्या भावबंधकीतील वादामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून त्याचा कृती समितीशी कोणताही संबंध नाहीभास्कर गुंजाळअध्यक्ष समृद्धी बाधीत कृती समिती जिल्ह्यातील सरकार मधील आमदार, व विरोधी पक्षतील आमदार खासदार भूमिका घेत नाही.

विरोध करणाऱ्या आमदारांची कामे अडवली जातात.कधी सांगतात विदर्भ, मराठवाड्याचा विकास सहन होत नाही.असा आरोप केला जातो. शेतकऱ्यांना तुम्ही समृध्दी चे शेतकरी नुसते संघटित होऊन चालणार नाही. तर 10 जिल्ह्यातील ज्यची जमीन जात नाही त्यांना ही संघटित करा असे मार्गदर्शन ही होत आहे. आज पर्यंत सर्व पक्ष नेते, शेतकरी संघटनेचे नेते यांना भेटलो आहोत. 40 केसेस मुंबई, नागपूर, औरंगाबाद हायकोर्टात दाखल आहेत. व आता सुनावणी ला येत आहेत.

सरकार ला भूसंपादन कायदा2013 ची अमलबजावणी एक प्रकल्प एक रेट, बागायती जमिनी टाळण्यासाठी भूमिका कोर्टात आहे. काही गावातील दर जाहीर अद्याप केलेला नाही. उदा. गोंदे गावांतील नाशिक पुणे रस्त्यासाठी 1 गुंठा साठी 2ते 3 लाख दिले आहेत तो भाव प्रमाणे 1 कोटी रु हेक्टरी होईल त्यामुळे दर जाहीर करत नाही. या प्रश्नावर पुढील काळात लढा सुरूच राहणार आहे. शेवटच्या शेतकऱ्यांला न्याय मिळे पर्यंत समिती लढा देईल. राजू देसले समन्वयक समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रहिंदुस्था

1 Comment

Click here to post a comment