लक्ष्यभेदी ‘राज’सभेनंतर मनसे सैनिक मराठी पाट्यांच्या मुद्यावर आक्रमक

raj sabha

टीम  महाराष्ट्र देशा – शनिवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा संपल्यावर मनसैनिकांनी घरी जाताना काही दुकानांत जाऊन इंग्रजी पाट्यांऐवजी मराठी पाट्या तातडीने लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या. या वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या मनसैनिकांना घरी जाण्यास सांगितल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी ‘दिली.

Loading...

गडकरी रंगायतनसमोरील रस्त्यावर राज यांनी जाहीर सभा घेऊन त्यात फेरीवाल्यांसह अनेक मुद्द्यांना हात घातला. या वेळी त्यांनी मनसेच्या आंदोलनामुळे मराठी पाट्या दिसू लागल्याची आठवण करून दिली. तसेच, यापुढे महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीचा वापर होत नसल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला. याचा परिणाम शनिवारी रात्री लगेच दिसून आला. सभा संपताच मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या लावलेल्या ठाण्यातील काही दुकानांत जाऊन इंग्रजीत लिहिलेल्या पाट्या त्वरित बदला व त्याऐवजी मराठी पाट्या लावा, असा इशारावजा दमच दिला. परंतु, ही परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. या वेळी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत मला कल्पना नाही, अशी माहिती फक्त सोशल मीडियावर फिरत आहे. ठोस माहिती माझ्याकडे नाही. परंतु, ठाण्यात मराठी पाट्या प्रत्येक दुकानाबाहेर दिसाव्या, यासाठी मनसे लवकरच मोठी मोहीम हाती घेणार आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...