रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रीय वाहतूकमंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार जुलै २०१९ पासून पुढे उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व कारमध्ये एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर्स,  प्रति तास ८० किलोमीटर पेक्षा अधिक वेगाने धावल्यास स्पीड वॉर्निंग देणारा अलर्ट, रिव्हर्स पार्किंग अलर्ट्स, मॅन्यूअल ओव्हरराईड सिस्टीम आदि फिचर्स असने बंधणकारक असणार आहे. रस्तेवाहतूक मंत्रालयाने नुकतेच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सध्यास्थितीत महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यन्वीत आहे. मात्र, या पुढे सर्वच कारमध्ये ही यंत्रणा बसवावी लागणार आहे.

 

अपघातातून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अपघातातून दगावणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार सन २०१६ मध्ये भारतात अपघातांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १.५ लाख आहे. त्यापैकी सुमारे ७४,००० लोक हे रस्ते अपघातात झाले आहेत.

 

 

You might also like
Comments
Loading...